महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांसह गोव्यात एकाच वेळी ‘दीपोत्सव’
By Admin | Updated: November 6, 2015 02:12 IST2015-11-06T02:12:25+5:302015-11-06T02:12:36+5:30
‘मराठीच्या अभिमानाचा उत्सव, दीपोत्सव’ दिवाळी अंकाची पहिली प्रत लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाला मंदिर न्यासाचे अध्यक्ष

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांसह गोव्यात एकाच वेळी ‘दीपोत्सव’
‘मराठीच्या अभिमानाचा उत्सव, दीपोत्सव’ दिवाळी अंकाची पहिली प्रत लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायकाला मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या उपस्थितीत अर्पण केली आणि मराठीचा सन्मान वाढविणाऱ्या उत्सवास आरंभ झाला. सर्वाधिक खपाचे एबीसी प्रमाणपत्र मिळविण्याचा मान प्राप्त करणाऱ्या दीपोत्सवच्या नावावर; एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसह गोव्यात प्रकाशन करण्याचा आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे!! मराठीचा अभिमान सार्थ करणाऱ्या या घटनेने मराठीचा सन्मानच वाढविला नाही तर मराठीचा उत्सव साजरा केला. दीपोत्सवच्या प्रकाशनाचा मुख्य समारंभ मुंबईत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आणि अ. भा. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक चंद्रशेखर ओक व लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. (गोव्यातील प्रकाशन/हॅलो १)