पार्ट्यांवर ‘विदेशीराज’, स्थानिकांवर गंडांतर

By Admin | Updated: December 21, 2015 02:05 IST2015-12-21T02:04:49+5:302015-12-21T02:05:43+5:30

पणजी : पर्यटक व्हिसावर येणारे विदेशी नागरिक किनारी भागांमध्ये नववर्षानिमित्त पार्ट्यांचे आयोजन करून बक्कळ

'AlienRaj' on the parties, Gondal on locals | पार्ट्यांवर ‘विदेशीराज’, स्थानिकांवर गंडांतर

पार्ट्यांवर ‘विदेशीराज’, स्थानिकांवर गंडांतर

पणजी : पर्यटक व्हिसावर येणारे विदेशी नागरिक किनारी भागांमध्ये नववर्षानिमित्त पार्ट्यांचे आयोजन करून बक्कळ पैसा कमवू लागले आहेत. सरकारी तिजोरीत कोणताही महसूल न भरता गोव्यातून पैसा कमावून मायदेशी परतण्याचा हा धंदा स्थानिक व्यावसायिकांच्या मुळावर आला आहे. कोणतेही परवाने न घेता शेतजमिनींमध्येही बेकायदा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पोलिसांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांचे यात हात ओले केले जात असल्याचा संशय आहे.
डिसेंबरच्या अखेरीस पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या आधी काही दिवस टुरिस्ट व्हिसावर हे विदेशी येतात आणि बक्कळ पैसा कमावून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मायदेशी परततात. पार्ट्यांमध्ये मद्याचा महापूर वाहतो; परंतु अबकारी खात्याला तेवढा महसूल मिळतो का, हा प्रश्न आहे. वाणिज्य कर खात्यालाही या पार्ट्यांमधून महसूल मिळत नाही. शेतजमिनींमध्ये कोणतीही गोष्ट करता येत नाही. असे असताना मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन शेतजमिनींमध्ये खुल्या जागेत केले जात असून प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. विदेशींकडून सर्व नियम धाब्यावर बसवून शेतजमिनींमध्ये होणाऱ्या या पार्ट्यांना परवाने देण्याचे सरकारचे धोरणच आहे का? पार्ट्यांच्या या आयोजनात सरकारचा मोठ्या प्रमाणात (पान २ वर)

Web Title: 'AlienRaj' on the parties, Gondal on locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.