मद्यालयांच्या वेळांविरुद्ध
By Admin | Updated: May 7, 2014 00:53 IST2014-05-06T20:44:08+5:302014-05-07T00:53:02+5:30
दरम्यान, कळंगुट किनारी भागातील काही डान्स बारमध्ये रात्री २ वाजल्यानंतर महिलांना मोफत मद्य वितरण केले जाते. रात्री २ वाजल्यानंतर महिलांना मोफत मद्य देण्यास परवानगी देणे म्हणजे मद्य आणि अनुचित प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे. कॅसिनोवर २४ तास मद्यपुरवठ्याला परवानगी, पंचतारांकित हॉटेल्समध्ये सकाळी ५ पर्यंत मद्यपुरवठ्याला परवानगी, पाच नगरपालिका क्षेत्रात व समुद्रकिनारी भागात सकाळी ४ पर्यंत मद्यपुरवठ्याला परवानगी आणि ग्रामीण भागात असलेल्या मद्यालयांत रात्री १ पर्यंत मद्यपुरवठा करण्यास परवानगी सरकारतर्फे देण्यात येत आहे, असे मत महिला संघटनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मद्यालयांच्या वाढीव वेळा स्थगित ठेवण्याचे तोंडी विधान केले होते; पण त्याबाबत कोणतीही लेखी सूचना मद्यालयांना किंवा अबकारी खात्याला पाठविण्यात आली नसल्याचे कळत आहे. अशा निर्णयामुळे एकंदर समाजव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार असून, या लढ्यात केवळ महिलांनीच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक जागृत नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला संघटनांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)