शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

कोमुनिदाद जागेतील बांधकामे कायदेशीर नकोच, अखिल गोवा कोमुनिदाद संघटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 8:21 PM

 म्हापसा : राज्यातील कोमुनिदाद जमिनीवरील घरे व अन्य बांधकामे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार असला तरीही याला अखिल गोवा कोमुनिदाद ...

 म्हापसा : राज्यातील कोमुनिदाद जमिनीवरील घरे व अन्य बांधकामे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार असला तरीही याला अखिल गोवा कोमुनिदाद संघटनेतर्फे विरोध केला आहे. कोमुनिदाद दुरूस्ती विधेयक येत्या पावसाळी विधानसभेत नकोच, असा इशारा राज्यभरातून सुमारे ५० पेक्षा अधिक कोमुनिदादच्या प्रतिनिधींनी यावेळी सरकारला दिला आहे.दरम्यान, कोमुनिदाद संहितेत काही सूचना किंवा फेरबदल करायचे असल्यास अगोदर कोमुनिदाद संघटनांसोबत चर्चा करावी. त्यांचे मत विचार घेऊनच पुढील कृती ठरवावी, असा सल्ला या प्रतिनिधींनी सरकारला दिला.म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कोमुनिदादच्या संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला जोरदार हरकत घेतली. यावेळी करमळी कोमुनिदादचे अध्यक्ष कॅ. व्हॅन्जी व्हिएगश, पोंबुर्फा कोमुनिदादचे ओल्ड्रीन परेरा, चांदोर कोमुनिदादचे अटर्नी जुएल फर्नांडिस आदी उपस्थित होते. तसेच उत्तर गोव्यातील ३५ व दक्षिण गोव्यातील १५ कोमुनिदादचे सदस्य व अ‍ॅटर्नी हजर होते. कोमुनिदाद संहिता दुरूस्त करण्याची गरज असून येत्या पावसाळी विधानसभेच्या अधिवेशनात सरकार हा दुरूस्ती विधेयक सादर करतील, अशी माहिती महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी माहिती दिली होती. याला अखिल गोवा कोमुनिदाद संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.कोमुनिदाद ही स्वतंत्र्य अनुकरणीय संघटना असून याचे संरक्षण करण्याची गरज आहे. मात्र, कायद्याच्या नावाने कोमुनिदाद संहितेत बेकायदेशीरपणे सरकार नाक खुपसून दुरूस्त्या करू पाहते. जे चुकीचे असून सरकारने कोमुनिदाद संघटनेला गृहीत धरून नये, असा आरोप कॅ. व्हॅन्जी व्हिएगश यांनी केला. सरकार परस्पर कोमुनिदाद संहिता बदलू शकत नाही. सरकारने कोमुनिदाद संघटनांना विश्वास न घेताच येत्या अधिवेशनात तो बदलण्याचे धोरण आखले आहे. आम्ही याला विरोध करतो. उत्तर व दक्षिण गोव्यातील सर्व कोमुनिदाद संघटनांतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महसूल मंत्री यांना निवेदन पाठवणार असल्याची माहिती ओल्ड्रीन परेरा यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा हे महसूल मंत्रीपदी असताना कोमुनिदाद आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. या आयोगाने काही वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार, कोमुनिदाद संहितेत दुरूस्त्या केल्या जातील. कोमुनिदाद जमिनीवरील बांधकामांविषयी आयोगाच्या अहवालात काही शिफारशी आहेत. यावेळी आयोगाने वेगवेगळी निरीक्षणे नोंदवत व विविध शिफारशींचा समावेश करून अहवाल दिला आहे. त्याआधारे सरकार विधानसभेत चर्चा करून हे दुरूस्ती विधेयक मंजूर करू पाहत आहे. मात्र, त्यापूर्वीच कोमुनिदाद संघटनांनी याला आक्षेप घेत सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.मुळात कोमुनिदाद जागेत किंवा शेत जमिनीत बांधकाम करणे बेकायदेशीर असून सरकारच अशा गोष्टींना खतपाणी देऊन ते कायदेशीर करू पाहत आहे. हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न चांदोर कोमुनिदादचे अटर्नी जुएल फर्नांडिस यांनी केला.  मामलेदार व उपजिल्हाधिकाºयांमुळे बेकायदा बांधकामांना उत्तेजन मिळाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

टॅग्स :goaगोवा