आंदोलन सुरूच राहणार
By Admin | Updated: July 9, 2015 01:16 IST2015-07-09T01:16:08+5:302015-07-09T01:16:19+5:30
पणजी : महापालिका कामगारांच्या आठ दिवसांच्या वेतनाबाबत जोपर्यंत पालिका प्रशासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे कामगार नेते अॅड. अजितसिंग राणे

आंदोलन सुरूच राहणार
पणजी : महापालिका कामगारांच्या आठ दिवसांच्या वेतनाबाबत जोपर्यंत पालिका प्रशासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे कामगार नेते अॅड. अजितसिंग राणे यांनी सांगितले. महापालिकेने कामगारांना ३२३ रुपये वेतन देण्याचे ठरवले आहे, हा एक प्रकारे कामगारांचा विजय आहे. मात्र, आम्ही ४0९ रुपयांच्या मागणीवर ठाम असल्याचेही राणे म्हणाले.
राणे यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी सायंकाळी न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केली. राणे यांना न्यायालयात पोलीस घेऊन येणार म्हणून सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व महापालिका कामगार न्यायालयाबाहेरील बागेत बसून होते. राणे यांना जामीन मिळाल्यानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला व राणे यांना उचलून घेतले.
दरम्यान, महापालिकेची महापौर शुभम चोडणकर यांनी बुधवारी बैठक घेतली. कामगार जरी ४0९ रुपये मागत असले, तरी पालिकेच्या अर्थकरणात बसत नसल्याने महापालिका वेतन वाढीचा निर्णय घेऊ शकत नाही. बैठकीत नगरसेवकांनी या विषयावर त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचा आवाज उठवला. आठ दिवसांच्या वेतनावर मजूर आयुक्तांनी दिलेल्या सल्ल्यांतील काही सल्ले प्रामुख्याने विचारात घेण्यात आले. याबाबत कामगार संघटनेकडे चर्चा करून गुरुवारपर्यंत यावर निर्णय देण्याबाबत ठरले असल्याचे चोडणकर म्हणाले.
दरम्यान, काही नगरसेवकांनी याला हस्तक्षेप घेतला.
(प्रतिनिधी)