आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर गोव्यात बंदी - मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
By किशोर कुबल | Updated: September 29, 2023 15:06 IST2023-09-29T15:06:29+5:302023-09-29T15:06:42+5:30
पणजी : गोव्यात सरकार काही काही आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ...

आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर गोव्यात बंदी - मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
पणजी : गोव्यात सरकार काही काही आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. जागतिक रेबिजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ लोक पाळत असलेले काही कुत्रे आक्रमक असतात व ते थेट लोकांवर हल्ला चढवतात. हा प्रकार जीवघेणा असतो. भटक्या कुत्र्यांमुळे राज्यात दररोज एक ते दोन गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. कुत्र्यांची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच त्यांची नसबंदी करण्याची गरज आहे.’
मुख्यमंत्री म्हणाले कि, ‘ लोक आवड म्हणून कुत्रे पाळतात परंतु त्यांचे लसीकरण करत नाहीत. ते करुन घ्यायला हवे.’ मुख्यमंत्री म्हणाले कि‘ गोवा हे देशातील एकमेव रेबीज मुक्त राज्य आहे, कुत्र्यांच्या लसीकरण करण्याबरोबरच मिशन रेबीजच्या सहकार्याने गोव्यातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाईल.’ मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ सर्वांनी प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज आहे. कोणीही प्राण्यांना दुखवू नये असे त्यानी केले.
दरम्यान, अलीकडेच ताळगांव येथे एका खाजगी पाळीव कुत्र्याने कुंपणाबाहेर उडी मारुन दोन शाळकरी मुलांना जखमी केले होते. त्याचे पडसादही नंतर उमटले होते. कुत्र्याच्या मालकावर कारवाई झाली होती.