शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चची सुरक्षा व्यवस्था वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 17:48 IST

कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

ठळक मुद्दे कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर पोलीस महासंचालकांशी आपण बोललो असून आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. गोव्यात जुने गोवे येथे सेंट झेवियरचे बॉ जिझस बासिलिका चर्च तसेच अन्य महत्त्चाची चर्च आहेत.

पणजी - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर पोलीस महासंचालकांशी आपण बोललो असून आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘खबरदारीच उपाययोजना म्हणून चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षेबाबत मी आढावा घेतलेला आहे. आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्याशीही चर्चा करुन आणखी काय करणे आवश्यक आहे हे पाहू.’ चर्चच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात जुने गोवे येथे सेंट झेवियरचे बॉ जिझस बासिलिका चर्च तसेच अन्य महत्त्चाची चर्च आहेत. राज्यातील ख्रिस्ती लोकसंख्या सुमारे 27 टक्के आहे. 

Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागूश्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत  संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.  

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसBlastस्फोटSri Lankaश्रीलंका