मधुकर मोर्डेकर यांचे मृत्यूपश्चात देहदान

By Admin | Updated: September 30, 2014 01:14 IST2014-09-30T01:10:49+5:302014-09-30T01:14:53+5:30

मडगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक मधुकर यशवंत मोर्डेकर यांचे सोमवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९४ वर्ष होते.

After the death of Madhukar Mordekar, Dahanadan | मधुकर मोर्डेकर यांचे मृत्यूपश्चात देहदान

मधुकर मोर्डेकर यांचे मृत्यूपश्चात देहदान

मडगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक मधुकर यशवंत मोर्डेकर यांचे सोमवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९४ वर्ष होते. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला. त्यांचे नेत्रही नेत्रपिढीला दान करण्यात आले.
गेले चार-पाच दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. अशातच सोमवारी सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मडगावातील अनेक सामाजिक कार्यात वाटा घेतलेले मोर्डेकर यांचे अंत्यदर्शन विविध स्तरांतील व्यक्तींनी घेतले. मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, खासदार नरेंद्र सावईकर, फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो, उपनगराध्यक्ष धनंजय मयेकर, नगरसेवक राजू नाईक, शर्मद रायतूरकर, स्वातंत्र्यसैनिक, मडगावातील व्यावसायिक व इतरांचा समावेश होता.
१४ सप्टेंबर १९२0 रोजी जन्मलेले मोर्डेकर यांनी १३व्या वर्षापासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वाटा घेतला होता. बॅ. नाथ पै यांच्या मार्गदर्शनाखाली १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४६ पासून ते कार्यरत होते. गोव्यात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या गाजलेल्या सभेनंतर जो उठाव झाला होता, त्यातही डॉ. मोर्डेकर यांचा समावेश होता. १८ आॅक्टोबर १९४६ रोजी त्यांनी म्हापसा येथे सत्याग्रह केल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे काम चालविले होते.गोव्यातील विविध सामाजिक कार्यातही त्यांचा समावेश होता. गोव्यात योग प्रसार व्हावा, यासाठीही त्यांनी तळमळीने काम केले. ‘अंबिका योग कुटीर’च्या माध्यमातून मोर्डेकर यांनी मडगावात योग साधना लोकप्रिय केली. गोमंत विद्या निकेतन, विद्या विकास मंडळ, समाज सेवा संघ, मडगाव अ‍ॅम्बुलन्स ट्रस्ट, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, (पान २ वर)

Web Title: After the death of Madhukar Mordekar, Dahanadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.