लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : तब्बल २३ वर्षानंतर भारतात फिडे विश्वचषक आयोजित करण्याचा योग आला व त्याचे एकमेव ठिकाण म्हणून गोव्याची निवड झाली. ही समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या विश्वचषकामुळे गोव्याची सी, सन अँड सँड ही प्रतिमा आता पर्यटन क्षेत्राबरोबरच क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी लाभदायी ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवन येथे केले.
फिडे विश्वचषकाच्या निमित्ताने साखळी येथील रवींद्र भवनात संलग्नित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र जी, फिडे विश्वचषकाचे कार्यकारी सचिव लुकास, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज फिडे विश्वचषकामुळे सुमारे ६३ देश गोव्याच्या भूमीत सहभागी झाले आहेत. त्याचा लाभयेथील अनेक लहान-मोठ्या होत आहे. बुद्धिबळपटूंना विश्वचषकानंतर बुद्धिबळाचे वातावरण कायम राहायला पाहिजे, म्हणूनच गोवा क्रीडा खात्यातर्फे बुद्धिबळ खेळासाठी योग्य स्पर्धा, शिबिरे, मार्गदर्शन व्हावे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, बुद्धिबळ हा वैचारिक खेळ असून या खेळात वैचारिक दृष्टी व चातुर्य लागते. गोव्यात आयोजित या विश्वचषकाने गोव्याची प्रतिमा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. या खेळातून अनेकांना उंच शिखर गाठण्याची संधी आहे. साखळीसारख्या शहरात बुद्धिबळ पुढे आणणे ही मोठी बाब असून या विश्वचषकातून गोव्यातील अनेक बुद्धिबळपटूंना भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे.
या कार्यक्रमात साखळी व परिसरातील हायस्कूलांना बुद्धिबळ बोर्ड व किटचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले. प्रारंभी स्वागतपर भाषणात संचालक अजय गावडे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली.
डोळ्यांवर पट्टी बांधून खेळ
या वेळी ग्रँडमास्टर तथा भारतीय महिला बुद्धिबळ प्रशिक्षक अभिजित खुंटे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून रवींद्र भवनच्या सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत बुद्धिबळ सामना खेळला. या सामन्याचा शुभारंभ पहिली चाल खेळत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने या सामन्यात चाली खेळल्या तर डोळ्यावर पट्टी बांधूनही खुंटे यांनी सहज या सर्व चालींवर मात करून सभागृहातील सर्वांनाच चेकमेट करत सामना जिंकला.
Web Summary : Goa hosts the FIDE World Cup after 23 years, a proud moment. CM Sawant highlights benefits for tourism and sports. Grandmaster Abhijit Kunte played blindfolded, inspiring local players. Chess kits were distributed to schools.
Web Summary : 23 साल बाद गोवा में फिडे विश्व कप का आयोजन। मुख्यमंत्री सावंत ने पर्यटन और खेल के लिए लाभों पर प्रकाश डाला। ग्रैंडमास्टर अभिजीत कुंटे ने पट्टी बांधकर खेला, स्थानीय खिलाड़ियों को प्रेरित किया। स्कूलों को शतरंज किट वितरित किए गए।