सासष्टी तालुक्यात मटका जुगारावर कारवाई, चौघांना अटक
By सूरज.नाईकपवार | Updated: April 19, 2023 10:21 IST2023-04-19T10:20:29+5:302023-04-19T10:21:14+5:30
मटका साहित्य व रोख रक्कम जप्त

सासष्टी तालुक्यात मटका जुगारावर कारवाई, चौघांना अटक
सूरज पवार, मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यात पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई केली. वेगवगळया कारवाईत पोलिसांनी मटका घेताना चार जणांना अटक केली. संशयितांविरोधात जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा नोंद करुन अटक करुन मागाहून त्यांना जामिनावर सोडण्यात आले.फातोर्डा पोलिसांनी गवळीवाडा येथे मटका घेताना चेतन चव्हाण याला ताब्यात घेतले. मटका साहित्य व रोख ६५० रुपये त्याच्याकडून जप्त केले तर अन्य एका कारवाईत येथील कदंब बस स्थानकनजिक मटका घेताना पोलिसांनी मनोज कांबळे याला पकडले, त्याच्याकडे ६८० रुपये जप्त केले.
कुंकळ्ळी पोलिसांनी पिसोणे बार्से येथे चंद्रहास वेळीप याला मटका घेताना अटक करुन १,०२० रुपये जप्त केले तर मायणा कुडतरी पोलिसांनी एका कारवाईत चार रोड जंक्शन गुडी येथे मारुती बिरजे याला मटका साहित्य व रोख ८८० रुपयांसह अटक केली. पुढील पाेलिस तपास चालू आहे.