कांदोळी येथे आयपीएल सट्ट्यावर कारवाई, बेटींग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By काशिराम म्हांबरे | Updated: April 22, 2024 15:56 IST2024-04-22T15:56:08+5:302024-04-22T15:56:59+5:30
केलेल्या कारवाईत पोलिसांनी अहमदाबाद ( गुजरात) येथील ९ जणांना सट्टा घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.

कांदोळी येथे आयपीएल सट्ट्यावर कारवाई, बेटींग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
म्हापसा : कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथील एका रिसॉर्टवर छापा मारून सुरु असलेल्या आयपीएलवर क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. केलेल्या कारवाईत पोलिसांनी अहमदाबाद ( गुजरात) येथील ९ जणांना सट्टा घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १७ मोबाईल, लॅपटॉप तसेच इतर साहित्या मिळून ४ लाख रुपये किंमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
रविवारी रात्री १२ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. किंग्स इलेव्हन पंजाब तसेच गुजरात टायटन्स या संघा दरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर त्यांच्याकडून बेटींग घेतले जात होते. अटक करण्यात आलेल्या संशयितात तिलोककुमार चेठानी, रॉकी तळेजा, पवनकुमार मंगलानी, किशन ललवाणी, गोपलानी भारत, दिनेश भाटीया, नरेश गेलवानी, चौथनी रिंकुकुमार तसेच रामचंदानी मनीष यांचा समावेश होतो.
ऑलनाईन सट्टेबाजी स्वीकारण्यासाठी स्वताची कायदेशीर संस्था असल्याचा आव आणून आरोपींनी लोकांची फसवणुक केल्याचे चौकशी दरम्यान पोलिसांना आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सर्व संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक हरिश वायंगणकर यांच्याकडून सुरु करण्यात आले आहे.