गोव्यात अंमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई; १२ ग्रॅम कोकेन, ८ ग्रॅम मेटाफेटामाईन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2023 18:04 IST2023-09-02T18:04:26+5:302023-09-02T18:04:34+5:30
दरम्यान बाह याचा यापूर्वीही अन्य काही अमलीपदार्थ व्यवहारांमध्ये समावेश तर नाही ना तसेच त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत, का ? त्यादिशेनेही चौकशी केली जात आहे.

गोव्यात अंमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई; १२ ग्रॅम कोकेन, ८ ग्रॅम मेटाफेटामाईन जप्त
पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी: अमलीपदार्थ विरोधी पथकाने पर्वरी येथे कारवाई करुन अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी लायबेरियन नागरिक पॅट्रीक बाह (२४) याला अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचा १२ ग्रॅम कोकेन व ८ ग्रॅम मेटाफेटामाईन हा अमलीपदार्थ जप्त केला.
पर्वरी येथे एक व्यक्ती अमलीपदार्थांचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची ठाेस माहिती मिळाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली. बाह याच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला . बाह याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान बाह याचा यापूर्वीही अन्य काही अमलीपदार्थ व्यवहारांमध्ये समावेश तर नाही ना तसेच त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत, का ? त्यादिशेनेही चौकशी केली जात आहे. अमलीपदार्थ विरोधी पथक याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.