मिश्र कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: December 31, 2015 02:26 IST2015-12-31T02:26:05+5:302015-12-31T02:26:49+5:30
पणजी : नगरविकास खात्यातर्फे जानेवारीत ७५ मुख्य शहरांबरोबर पणजीतही स्वच्छतेसंदर्भात ‘सर्वेक्षण’ मोहीम राबविली

मिश्र कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई
पणजी : नगरविकास खात्यातर्फे जानेवारीत ७५ मुख्य शहरांबरोबर पणजीतही स्वच्छतेसंदर्भात ‘सर्वेक्षण’ मोहीम राबविली जाणार आहे. दरम्यान, पणजीत ही मोहीम दि. ५ ते २0 जानेवारीपर्यंत राबविण्यात येईल. तसेच मिश्र कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी दिले आहेत.
महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जन्मशताब्दीनिमित्त २0१९ पर्यंत कचरा मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅक्टोबर २0१४ साली ‘स्वच्छ भारत योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत येत्या वर्षात नगरविकास खात्यातर्फे विविध शहरांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे रॉड्रिग्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातल्या रस्त्यांवरील कचरा व्यवस्थापन हे महापालिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने २00३ सालापासून योग्य तऱ्हेने कचरा व्यवस्थापन सांभाळले आहे. नियमितपणे दारोदारी कचरा उचलण्याच्या उपक्रमात पणजी महापालिका शंभर टक्के यशस्वी झाली आहे. शहरात ६५ कचरा प्रक्रियेची केंद्रे आहेत. शहरातील ८0 टक्के कचऱ्याची विल्हेवाट या केंद्रांद्वारे केली जाते. शहरात चांगल्या पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्यात येत असून पुरेशा कचरा पेट्या, वेळोवेळी कचरा उचलणे, व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे पणजीत शहरातची स्वच्छता योग्य दिशेने होत असल्याचे मत रॉड्रिग्स यांनी मांडले.