पणजी : गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकमधील कारवार येथील अपक्ष आमदार सतीश सैल यांना समन्स बजावले आहे. सोमवारी त्यांना एसआयटीपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.या आमदाराचा खाण घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: बेकायदेशीरपणे खनिज निर्यात प्रकरणात ते गोवा एसआयटीला हवे आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या निर्यातदार कंपनीचे सैल संचालक आहेत.
कारवारच्या आमदारास समन्स, विशेष तपास पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:46 IST