शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शंभर मीटर अंतराच्या आत मद्यालयांना परवानगी देण्याचा कायदा १९८० चा - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 27, 2024 15:19 IST

गोवा फॉरवर्डने केली टीका.

किशोर कुबल/पणजी

पणजी : मंदिरे, चर्च आदी धार्मिक स्थळे तसेच विद्यालयांपासून शंभर मीटर अंतराच्या आत मद्यालयांना परवानगी देण्याचा कायदा १९८० मधील आहे. हा कायदा नवीन नाही. उलट परवाना व नूतनीकरण शुल्क दुपटीने वाढवून मी आणखी अडचणी निर्माण केलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिसूचनेचे समर्थन करताना स्पष्ट केले. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेऊन विरोध केलेला आहे. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की,' विरोधी काँग्रेस पक्षाला नेहमीच खोट्या गोष्टी लोकांना सांगून दिशाभूल करण्याची सवय आहे. हा कायदा प्रत्यक्षात १९८० मधील आहे.'

मुख्यमंत्री म्हणाले की,' मी  मद्यालये उघडण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन दिलेले नाही. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री असूनही एकाही मद्यालयाला मी परवाना दिलेला नाही. मंदिरे चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळांपासून तसेच विद्यालयांपासून शंभर मीटर अंतराच्या आत सरकारच्या परवानगीने परवाने देता येतील, ही तरतूद जर मी काढून टाकली तर हजारो बार बंद करावे लागतील व या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होईल.'

गोवा फॉरवर्डची टीकादरम्यान गोवा फॉरवर्ड चे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या निर्णयावर हल्लाबोल करताना सरकारने चुकीचा संदेश दिलेला आहे, अशी टीका केली. सरकारने आता थेट विद्यालयांमध्ये व मंदिरामध्येही बार सुरू करावेत, असे टीकेच्या स्वरात ते म्हणाले. परप्रांतीय व्यावसायिक दुप्पट शुल्क भरून गोव्यात विद्यालयांजवळ बार उघडतील त्याचे काय? असा प्रश्न करून सरदेसाई म्हणाले की,' काही वर्षांपूर्वी भाजप सरकारनेच माडाला गवत म्हणून अधिसूचित करून माडांची कत्तल करण्याचा मार्ग मोकळा केला होता. परंतु विरोधकांनी आवाज उठवला, त्यामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. शंभर मीटर अंतरात बारना परवाने देण्याच्या प्रकरणातही मोठे 'सेटिंग'आहे ,असा आरोप त्यांनी केला.

तृणमूल काँग्रेसकडून निषेधतृणमूल काँग्रेसचे प्रदेश संयुक्त निमंत्रक समील वळवईकर यांनी सरकारवर जोरदार टीका करताना भाजपचे धार्मिक व संस्कृतीप्रती असलेला ढोंगीपणा उघड झाल्याचे म्हटले आहे.  अधिसूचनेचा त्यांनी निषेध केला आहे. 

टॅग्स :goaगोवा