दिप्ती साळगावकरांचेही खाते

By Admin | Updated: February 10, 2015 01:45 IST2015-02-10T01:38:52+5:302015-02-10T01:45:45+5:30

पणजी : गोव्याचे उद्योगपती दत्तराज साळगावकर यांच्या पत्नी दिप्ती साळगावकर यांचेही विदेशात हाँगकाँग- शांघाय बँकेत खाते असल्याचे उघड झाले आहे.

Account of Dipti Salgaocar | दिप्ती साळगावकरांचेही खाते

दिप्ती साळगावकरांचेही खाते

पणजी : गोव्याचे उद्योगपती दत्तराज साळगावकर यांच्या पत्नी दिप्ती साळगावकर यांचेही विदेशात हाँगकाँग- शांघाय बँकेत खाते असल्याचे उघड झाले आहे. विदेशात बँक खाते असलेल्या राधा तिंबले यांच्यानंतर साळगावकर या दुसऱ्या गोमंतकीय महिला ठरल्या आहेत.
राधा तिंबले, त्यांचे पुत्र चेतन
तिंबले आणि त्यांच्या खाण कंपनीची
केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. विदेशात बँक खाती असलेल्या देशभरातील आणखी काही उद्योजकांची नावे राष्ट्रीय स्तरावरून आता पुन्हा उजेडात आली आहेत. त्यात दिप्ती साळगावकर यांचेही नाव आल्याने गोव्यात हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.
दत्तराज साळगावकर हे व्ही. एम. साळगावकर कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची कंपनी ही गोव्यातील उद्योग क्षेत्रातील एक खूप मोठी कंपनी मानली जाते.
दिप्ती साळगावकर या दत्तराज यांच्या
पत्नी आहेत.
साळगावकर कंपनीतर्फे
खाण, जहाजोद्योग, हॉटेल व अन्य व्यवसाय चालविले जातात. (खास प्रतिनिधी)

Web Title: Account of Dipti Salgaocar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.