खात्यात फेरबदलामुळे खदखद
By Admin | Updated: October 5, 2015 02:25 IST2015-10-05T02:25:22+5:302015-10-05T02:25:34+5:30
पणजी : खात्यामध्ये फेरबदल केल्यामुळे मंत्रिमंडळात असंतोष खदखदतो आहे. मंत्री एलिना साल्ढाणा यांच्याकडील वन आणि पर्यावरण हे महत्त्वाचे खाते काढून घेतले आहे.

खात्यात फेरबदलामुळे खदखद
पणजी : खात्यामध्ये फेरबदल केल्यामुळे मंत्रिमंडळात असंतोष खदखदतो आहे. मंत्री एलिना साल्ढाणा यांच्याकडील वन आणि पर्यावरण हे महत्त्वाचे खाते काढून घेतले आहे. त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आणि म्युझियम ही गौण मानली जाणारी खाती दिली आहेत. मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याकडील पंचायत खाते तर मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडील माहिती-प्रसारण खातेही काढून घेतले आहे. अन्य मंत्र्यांच्या खात्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेले राजेंद्र आर्लेकर यांना पंचायत तसेच वन आणि पर्यावरण ही दोन महत्त्वाची खाती दिलेली आहेत. खातेबदलाची अधिसूचना सोमवारी (दि.५) काढली जाईल. मात्र, या एकूण घडामोडीत महत्त्वाची खाती गमावलेले मंत्री मांद्रेकर आणि एलिना कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात तीव्र असंतोष खदखदतो आहे.
खातेबदलाच्या पार्श्वभूमीवर मंत्री एलिना साल्ढाणा सोमवारी (दि.५) अधिकृत अधिसूचना आल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणणे मांडणार आहेत. दुसरीकडे पंचायत खाते गमावलेले मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्यातही असंतोष खदखदत आहे. मी आताच निष्क्रिय ठरलो काय? असा संतप्त सवाल मांद्रेकर (पान २ वर)