accident between passenger bus and container at goa. 9 passenger get injured | गोव्यात प्रवासी बस व  कंटेनर ट्रक यांच्यात अपघात होउन 9 जखमी
गोव्यात प्रवासी बस व  कंटेनर ट्रक यांच्यात अपघात होउन 9 जखमी

मडगाव:  गोव्यात आज शनिवारी प्रवासी बस व कंटनेर या दोन वाहनात अपघात होउन नउजण जखमी झाले. कुंकळळी पोलीस ठाण्याच्या हददीतील घोडेमळ - खडडे बाळळी येथे दुपारी पावणोबाराच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. जखमींत बसचालकाचाही समावेश आहे. जखमीपैंकी पाचजणांवर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहे. बाकींच्यांना उपचारानंतर घरी पाठवून देण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  जीए - 08 व्ही - 2425 क्रमाकांची बस मडगावहून कारवारला निघाली होती तर विरुध्द बाजूने आरजे - 14- जीजे 7921 क्रमाकांचा कंटेनर ट्रक येत होते. वळणार या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. यात बसचालक व्यकंटेश यडीगर (39) याच्यासह देशराज ठाकूर (45), संजय मोगे (45), शेवंती पागी (45), अर्चना फडते (55), हर्षा च्यारी (56), अमृत फडते (65),  अरुण फडते (50) व राजेश (35) हे जखमी झाले. यातील व्यंकटेश यडीगर , देशराज ठाकूर, अर्चना फडते, हर्षा च्यारी व अमृत फडते यांच्यावर हॉस्पिसियोत उपचार चालू आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानतंर कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला.


Web Title: accident between passenger bus and container at goa. 9 passenger get injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.