सुझान खानच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला
By Admin | Updated: July 8, 2016 21:07 IST2016-07-08T21:07:44+5:302016-07-08T21:07:44+5:30
अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्या विरोधात गोवन कन्स्ट्रक्शन कंपनीने 15 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.

सुझान खानच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ८ : अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्या विरोधात गोवन कन्स्ट्रक्शन कंपनीने 15 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कंपनीबद्दल बदनामीकारक खोटी माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याचा आरोप सुझानवर ठेवला आहे. स्वत: आर्किटेक्ट व डिझायनर असल्याचे खोटे सांगून सुझानने गोवन कन्स्ट्रक्शन कंपनीला कोटय़वधी रुपयांना फसविल्याची तक्रार कंपनीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही नोंदवला आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून तिने कंत्रट मिळविल्याचा, तसेच नंतर बांधकामही निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार तिच्याविरुद्ध आहे.