आमदाराच्या गैरहजरीने डोकेदुखी

By Admin | Updated: July 2, 2015 00:38 IST2015-07-02T00:38:27+5:302015-07-02T00:38:27+5:30

माजोर्डा येथील कॅसिनो ट्रेजर्सच्या सरव्यवस्थापकाला धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी आमदार मिकी पाशेको न्यायालयात हजर न झाल्याने सडा तुंरुग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

The absence of the MLA is a headache | आमदाराच्या गैरहजरीने डोकेदुखी

आमदाराच्या गैरहजरीने डोकेदुखी

मडगाव (गोवा) : माजोर्डा येथील कॅसिनो ट्रेजर्सच्या सरव्यवस्थापकाला धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी आमदार मिकी पाशेको न्यायालयात हजर न झाल्याने सडा तुंरुग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पाशेको सध्या सडा तुरुगांत आहेत. मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी कल्पना गवस यांच्यासमोर हा खटला
सुनावणीस आला. प्रकरणातील दुसरा आरोपी मॅथ्यू दिनीज न्यायालयात हजर होता. कामत मंत्रिमंडळात पर्यटनमंत्री असताना २९ मे २00९ रोजी पाशेको यांनी
माजोर्डा बीच रिसॉर्टमधील
कॅसिनोचे सरव्यवस्थापक जेराल्ड फर्नांडिस यांना धमकी दिली होती. प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तिवाद २९ जुलैला होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The absence of the MLA is a headache