ड्रग्स व्यवहारात ५८ टक्के नायजेरियन

By Admin | Updated: January 9, 2015 02:14 IST2015-01-09T02:13:49+5:302015-01-09T02:14:49+5:30

पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या व्यवहार प्रकरणात पकडण्यात आलेल्या विदेशी नागरिकांत ५८ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याचे अमली पदार्थविरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.

About 58 percent Nigerian drug use | ड्रग्स व्यवहारात ५८ टक्के नायजेरियन

ड्रग्स व्यवहारात ५८ टक्के नायजेरियन

पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या व्यवहार प्रकरणात पकडण्यात आलेल्या विदेशी नागरिकांत ५८ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याचे अमली पदार्थविरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
२०१४ वर्षात एकूण ३६.९५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात एकूण ५८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३० जण भारतीय आहेत, तर २८ जण विदेशी आहेत. विदेशी नागरिकांत १६ टक्के लोक हे नायजेरियन नागरिक असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी विभागाकडून देण्यात आली. इतर विदेशी नागरिकांत ब्रिटिश, रशिया, इस्रायल आणि इतर देशांच्या नागरिकांचा सहभाग आहे.
शिक्षणासाठी आणि अन्य कारणासाठी म्हणून नायजेरियन नागरिक गोव्यात येतात. विविध शैक्षणिक संस्थांत ते प्रवेशही घेतात; परंतु बरीच वर्षे ते गोव्यात राहतात. व्हिसा संपल्यावरही गोव्यात राहिल्यामुळे अनेकांवर कारवायाही करण्यात आलेल्या आहेत. काही नायजेरियन लोकांवर कोर्टात खटले सुरू असल्यामुळे त्यांची गोव्यातून हकालपट्टी करणेही कायद्याच्या दृष्टीने शक्य होत नाही. या गोष्टींचा फायदा घेऊन ते गोव्यात राहून अमली पदार्थांचा व्यवहार करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वर्षभरात एकूण २.९७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ विभागाने जप्त केलेल्या अमली पदार्थात ६.२ किलो चरस, १७.७ किलो गांजा, २५५ ग्रॅम एमडीएमए, ५१ ग्रॅम हेरॉईन, ३७.४ ग्रॅम कोकेन व ०.०७ ग्रॅम एलएसडीचा समावेश आहे. या शिवाय उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील पोलिसांनीही अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Web Title: About 58 percent Nigerian drug use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.