‘आकांतवादी गोंयांत नाका’वर सादरकर्ते ठाम!
By Admin | Updated: August 9, 2014 01:24 IST2014-08-09T01:20:25+5:302014-08-09T01:24:43+5:30
मडगाव : तौसिफ द नावेली या तियात्रिस्ताने लिहिलेल्या आणि शनिवारी मडगावात प्रयोग होणारा ‘आकांतवादी गोंयांत नाका’ हा तियात्र कितीही धमक्या आल्या,

‘आकांतवादी गोंयांत नाका’वर सादरकर्ते ठाम!
मडगाव : तौसिफ द नावेली या तियात्रिस्ताने लिहिलेल्या आणि शनिवारी मडगावात प्रयोग होणारा ‘आकांतवादी गोंयांत नाका’ हा तियात्र कितीही धमक्या आल्या, तरीही दाखविला जाणारच, असा इरादा तियात्राचे दिग्दर्शक तौसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे. आपल्याला हा प्रयोग सादर करण्यासाठी पोलिसांचे संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी अर्जही केला आहे. दरम्यान, शुक्रवारीही आपल्याला धमक्यांचे फोन आल्याचे तौसिफ यांनी स्पष्ट केले. फक्त गोव्यातूनच नव्हे, तर कर्नाटक व महाराष्ट्रातूनही धमकीचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रयोग सादर करण्यासाठी श्रीराम सेनेने विरोध केला आहे. या संघटनेचे कर्नाटक राज्याचे संघटनमंत्री गंगाधर कुलकर्णी शुक्रवारी मडगावात दाखल झाले. सनातन संस्थेचे डॉ. मनोज सोळंकी यांच्याबरोबर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शनिवारचा प्रयोग कोणत्याही स्थितीत आम्ही होऊ देणार नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रयोगावर बंदी आण्यासाठी सेनेतर्फे प्रयत्न चालू आहेत. (प्रतिनिधी)