गोव्यातील सासष्टीतील सेर्नाभाटी येथे खेळत असताना पडल्याने पश्चिम बंगालातील युवकाचा मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Updated: March 4, 2024 16:52 IST2024-03-04T16:52:29+5:302024-03-04T16:52:45+5:30
तो रोजंदारीवर काम करीत होता अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली.

गोव्यातील सासष्टीतील सेर्नाभाटी येथे खेळत असताना पडल्याने पश्चिम बंगालातील युवकाचा मृत्यू
मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सेर्नाभाटी येथे किनाऱ्यावर खेळत असताना अचानक पडल्याने एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सांयकाळी ही घटना घडली. हबीबुर एसके असे मयताचे नाव असून, तो मूळ पश्चिम बंगाल राज्यातील आहे. तो आपल्या भावासोबत सदया चिंचामोरड वानेली कोलवा येथे रहात होता. तो रोजंदारीवर काम करत होता अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
फिट आल्याने तो खेळत असताना, पडला नंतर त्याला १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षदा नाईक देसाई व पोलिसांनी नंतर घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यु म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.