शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या मुलाबरोबरचा 'तो' प्रवास तिचा अखेरचा ठरला

By आप्पा बुवा | Updated: April 17, 2023 18:25 IST

मुलासोबत बाजारात जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. 

फोंडा (गोवा) : शनिवारी दुपारी आपल्या मुलासोबत बाजारात जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा स्वयं अपघातातमृत्यू झाला असून, भरधाव वेगात असलेल्या स्कूटर चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने सदर अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बेतोडा येथील जंक्शन जवळ झालेल्या सदर अपघातात स्कूटर वरून रस्त्यावर पडलेल्या बालकिश केदार शेख (४२, केजीएन नगर, बेतोडा) या महिलेचा गोमेकोत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

सविस्तर वृत्तानुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्दैवी महिला जीए- ०५- क्यू - ५१६१ क्रमांकाच्या स्कूटर वरून आपल्या मुलासह फोंडा येथे जात होती. सदर मार्गावर अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत भरधाव वेगात येणाऱ्या तिच्या मुलाला जंक्शन जवळील गतिरोधकाचा अंदाज आला नाही व गतिरोधक वर गाडा चढताच त्याचा तोल गेला व तो    तो स्कूटरसह रस्त्यावर आपटला. स्कुटरच्या मागे बसलेली तिची आई सुध्दा यावेळेस रस्त्यावर पडली या अपघातात ती  गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर जखमी महिलेला १०८ रुग्णवाहिकेतून अगोदर उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले होते. डोक्याला गंभीर जखम झाल्याने अधिक उपचारासाठी  सदर महिलेला गोमेकोत नेण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी जखमी महिलेचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.  फोंडा ते बेतोडा तसेच हॉटेल आमीगोस, ते बेतोडा, बोरी ते बेतोडा ह्या तिन्ही रस्त्यावर भरधाव वाहने चालवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. खूप वेळा येथे दुचाकींच्या शर्यती सुद्धा लावल्या जातात. त्यामुळेच इथे अनेक अपघात घडलेले आहेत. तेव्हा पोलिसांनी या भागात निरंतरपणे गस्त ठेवावी अशी मागणी आता नागरिकाकडून होत आहे.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातDeathमृत्यू