घरावर झाड कोसळून महिला जखमी 

By काशिराम म्हांबरे | Published: April 3, 2024 02:59 PM2024-04-03T14:59:38+5:302024-04-03T14:59:49+5:30

घटनेत यशोदा राठोड ही महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

A woman was injured when a tree fell on her house | घरावर झाड कोसळून महिला जखमी 

घरावर झाड कोसळून महिला जखमी 

म्हापसा : बार्देश तालुक्यातील शिरसई-बडये येथे एका घरावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळून घराची सुमारे १ लाख रुपयांची नुकसानी झाली आहे. घटनेत यशोदा राठोड ही महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

म्हापसा अग्नी शमन दलाच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार घटना मंगळवारी रात्री घडली. झाड पडलेल्या त्या घरात जखमी महिला आपल्या पती समवेत रहात होती. ज्यावेळी ही घटना घटली त्यावेळी ते झोपले होते. 

घटनेची माहिती उपलब्ध होताच अग्निशमन दलाचे जवान उपअधिकारी प्रशांत शेटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली घटना स्थळी दाखल होऊन झाड कापून बाजूला केले. झाड कापण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. घटनेत घराचे छत पूर्णपणे कोसळले आहे. तसेच घरातील सामानाची बरीच मोडतोड झाल्याने नुकसानीस कारण ठरले आहे.

Web Title: A woman was injured when a tree fell on her house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा