७५ कोटी रुपये खर्च करून उभी राहणार मनपाची सुसज्ज इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
By पूजा प्रभूगावकर | Updated: October 4, 2023 17:53 IST2023-10-04T17:53:16+5:302023-10-04T17:53:24+5:30
पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) नव्या इमारतीची बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

७५ कोटी रुपये खर्च करून उभी राहणार मनपाची सुसज्ज इमारत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
पणजी : पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) नव्या इमारतीची बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी झाली. ७५ कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारली जाणार आहे. या पायाभरणी कार्यक्रमाला पणजी मनपाचे आयुक्त क्लेन मदेरा, महापौर राशहित मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच मनपाचे आजी- माजी नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पणजी मनपा ही गोव्यातील एकमेव महापालिका असून मनपाला आता लवकरच नवी सुसज्ज अशी इमारत मिळणार आहे. ७५ कोटी रुपये खर्च करून या इमारतीचे बांधकाम केले जाणार असून जी सुडा हे काम करणार आहे. मनपाचे प्रशासकीय कार्यालय तसेच अन्य सुविधांचा या इमारतीत समावेश आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यानुसार या प्रकल्पाची पायाभरणी झाली, असे त्यांनी नमूद केले.