चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती
By वासुदेव.पागी | Updated: July 19, 2023 13:04 IST2023-07-19T13:03:59+5:302023-07-19T13:04:14+5:30
मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत.

चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती
पणजीः कंटेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट हे ऐकून कुणीही आश्चर्य व्यक्त करील, परंतु गोष्ट खरी आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ही माहिती विधानसभेत दिली. मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत.
आता एक कंन्टेनरमध्येच आउटपोस्ट थाटण्याचे खटाटोप पोलीस करीत असल्याचे आमदार आमोणकर त्यांनी सांगितले. कारण ज्या जागेत सध्या आउटपोस्ट आहे. ती जागा अत्यंत गैरसोयीची आहे. या तिथे पोलिसांना बसण्यासाठीही सारखी व्यवस्था नाही. त्यामुळे काम करण्याचे वातावरणच त्या ठिकाणी नाही. अशा परिस्थितीतही ते पोलीस काम करतात या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असे ते म्हणाले. या आउटपोस्टसाठी पोलीस कर्मचारीही अपुरे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावर लवकरच जागा पाहुन आउटपोस्ट स्थलांतरीत केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच कुठलीही मोकळी इमारत आमदारांना ठाऊक असल्यास त्याची माहिती द्यावी असे सांगितले. यावर आमदाराने रवींद्र भवनातील काही खोल्या रिकाम्या असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी आउटपोस्ट. स्थलांतरीत केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.