शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू, कुंकळ्ळी परिसरात धक्कादायक घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: April 25, 2024 17:27 IST

काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

मडगाव : ९ वर्षीय मुलगी आपल्या पालकांची नजर चुकवून घराशेजारील कालव्यातील पाण्यात उतरली. यावेळी तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

पुर्णिमा अजोय चौधरी असे त्या मुलीचे नाव असून, मुलीचे कुटुंब मूळ पश्चिम बंगालमधील आहे. ती मुलगी विशेष होती. कालव्यातील पाण्यात पडल्यानंतर तिने आरडाआरोडा केला. त्यानंतर तिच्या वडिलाने लगेच तिला पाण्याबाहेर काढले आणि बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतीली फस्ट गेट येथे मुलगी आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. तिला बालपणापासूनच पाण्यात खेळण्याची आवड होती. त्यामुळे ती कालव्यात आपल्या कुटुंबीयांची नजर चुकवून गेली होती. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी नोंद केली आहे. तसेच, पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा