शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात, भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने २७ वर्षीय तरुणाचा घेतला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 22:39 IST

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ६.०५ च्या सुमारास तो अपघात घडला.

वास्को: गुरूवारी (दि.१०) संध्याकाळी दक्षिण गोव्यातील नुवे महामार्गावरून भरधाव वेगाने वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या टॅक्सी चारचाकीने फादर आग्नेल आश्रम जंक्श्नसमोर दुचाकीला जबर धडक देऊन झालेल्या अपघातात २७ वर्षीय दुचाकी चालक आकाश गावडा याचा दुर्देवी अंत झाला. दामोदर नाईक (वय ४४, रा: काणकोण) नुवे येथून वेर्णाच्या दिशेने तो चालवणारी टॅक्सी भरधाव वेगाने हाकत येताना फादर आग्नेल आश्रम जंक्शनवर त्याचा स्टीअरींगवरील ताबा जाऊन त्यांने तेथून जाणाºया आकाश गावडा याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याची प्रथम माहीती वेर्णा पोलीसांना चौकशीवेळी मिळाली आहे. वेर्णा पोलीसांनी ह्या अपघात प्रकरणात टॅक्सी चालक दामोदर नाईक विरुद्ध भादस २७९, ३०४ ए कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, संध्याकाळी ६.०५ च्या सुमारास तो अपघात घडला. कोणकोण येथील दामोदर नाईक नामक चालक तो चालवणारी टॅक्सी (जीए ०८ व्ही ०३१६) घेऊन भरधाव वेगाने नुवे हून वेर्णाच्या दिशेने जात होता. जेव्हा तो माटोल - वेर्णा येथील फादर आग्नेल आश्रम जंक्शन जवळ पोचला त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या चारचाकीच्या स्टीअरींगवरील त्याचा ताबा सुटला अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली. याचवेळी कुठ्ठाळी हून नुवेच्या दिशेने जाणाºया दुचाकीवर (जीए ०८ एआर ७४६१) दामोदर नाईक याच्या टॅक्सीने जबर धडक दिली. ह्या अपघातात दुचाकीवर असलेला आकाश गावडा (रा: मात्तीमोरोड, सेंट जुझे दी आरीयल, सासष्टी) रस्त्यावर फेकला जाऊन तो गंभीररित्या जखमी झाला. अपघातानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या आकाशला त्वरित उपचारासाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मरण पोचलेल्या आकाश ने दुचाकी चालवताना हॅल्मेट घातले होते अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. ती टॅक्सी चारचाकी अपघातावेळी एकदम भरधाव वेगाने होती असे घटनास्थळावरील लोकांकडून चौकशीवेळी कळाल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात