दिल्लीतील २६ वर्षीय पर्यटकाचे गोव्यातील मडगावात एका हॉटेलात आत्महत्या
By सूरज.नाईकपवार | Updated: March 1, 2024 10:09 IST2024-03-01T10:09:40+5:302024-03-01T10:09:50+5:30
दिल्ली येथील एका २६ वर्षीय पर्यटकांनी गोव्यातील मडगाव शहरातील एका हॉटेलात रुममध्ये आत्महत्या केली. जोसेफ हेन्री मॅथ्युस असे मयताचे नाव आहे.गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी वरील घटना घडली.

दिल्लीतील २६ वर्षीय पर्यटकाचे गोव्यातील मडगावात एका हॉटेलात आत्महत्या
मडगाव: दिल्ली येथील एका २६ वर्षीय पर्यटकांनी गोव्यातील मडगाव शहरातील एका हॉटेलात रुममध्ये आत्महत्या केली. जोसेफ हेन्री मॅथ्युस असे मयताचे नाव आहे.गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी वरील घटना घडली. शहरातील एका हॉटेलात तो उतरला होता. तेथे त्याने एक खोली राहायला घेतली होती. त्यात खोलीत त्याने आत्महत्या केली.
मयताने आपण उतरलेल्या खोलीच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. त्या हॉटेलाचे मॅनेजर विनय पुंडलीक कामत यांनी या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मयत मृतावस्थेत सापडला. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आहे. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे.