शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोवा पोलीस दलासाठी 902 पदे मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 14:28 IST

सरकारने गोवा पोलीस दलासाठी 902 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच या पदांवर भरती होणार आहे.

‎पणजी : सरकारने गोवा पोलीस दलासाठी 902 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच या पदांवर भरती होणार आहे.‎ नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्यटकांची वाढती संख्या तसेच कायदा सुव्यवस्थेचा विषय आणि अन्य प्रश्न असल्याने एकूण 1228 पदे भरण्यासाठी पोलीस दलाने मंजुरी मागितली होती.परंतु 902 पदे मंजूर करण्यात आली. आजवर गोवा पोलीस दलाला मंजूर झालेल्या मनुष्यबळाची एकूण संख्या 7 हजार 848 एवढी आहे. परंतु केवळ 6 हजार 51 पदे भरलेली आहेत. पोलिस शिपायापासून पोलीस अधीक्षकापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत आणि त्यांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. याआधी गोवा पोलिसांनी प्रस्ताव दिल्यानुसार पाच अधीक्षक, तेरा उपाधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, तीनशे उपनिरीक्षक, अडीचशे सहाय्यक उपनिरीक्षक आणि तीनशे हवालदार पोलीस शिपाई पदाची गरज असल्याचे म्हटले होते.मंजूर झालेल्या 902 पदांमध्ये कोणकोणत्या हुद्याची किती पदे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. अशी माहिती मिळते की, गेल्या काही वर्षात पोलिस शिपायांची घाऊक पदे निर्माण करण्यात आली. परंतु त्या तुलनेत हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, निरीक्षक, अधीक्षक यांची पदे निर्माण झाली नाही. पोलीस शिपायाला हवालदार पदी बढती मिळवण्यासाठी 20 ते 25 वर्षे काम करावे लागते. त्यामुळे शिपाई पदी सेवेत रुजू झालेल्या व्यक्तीला निवृत्त होईपर्यंत संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकाच बढतीवर समाधान मानावे लागते.

टॅग्स :Policeपोलिस