८७ टक्के विद्यार्थी पाहतात ‘ब्ल्यू फिल्म’

By Admin | Updated: July 25, 2014 01:51 IST2014-07-25T01:48:51+5:302014-07-25T01:51:12+5:30

पणजी : अश्लील चित्रफिती पाहण्याची घातक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. राज्यात दररोज १८ ते २२ वर्षे वयोगटातील सरासरी ८७ टक्के विद्यार्थी अश्लील

87 percent students see 'blue film' | ८७ टक्के विद्यार्थी पाहतात ‘ब्ल्यू फिल्म’

८७ टक्के विद्यार्थी पाहतात ‘ब्ल्यू फिल्म’

पणजी : अश्लील चित्रफिती पाहण्याची घातक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. राज्यात दररोज १८ ते २२ वर्षे वयोगटातील सरासरी ८७ टक्के विद्यार्थी अश्लील चित्रफिती व बलात्काराचे व्हिडिओ पाहतात, असे धक्कादायक चित्र ‘रेस्क्यू’ संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
अश्लील चित्रफिती पाहिल्याने बालवयात व किशोरवयात सेक्स विषयाचे योग्य ज्ञान मिळत नसल्याने मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. महिलांवर वाढणारे अत्याचार याच्याशी निगडित आहेत. गोव्यातील १0 कॉलेजांतील २00 विद्यार्थ्यांत (मुलगे) केलेल्या सर्वेक्षणानुसार, १८ ते २२ वर्षे वयोगटांतील मुले अश्लील चित्रफिती पाहतात.
(प्रतिनिधी) (आणखी वृत्त/२)

Web Title: 87 percent students see 'blue film'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.