शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अबब... जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनात ८५ हजारांची बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 02:13 IST

खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्याची स्थिती प्रचंड खालवल्याचे चित्र आहे. मात्र, तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पालकांची दानत ही खासगी शाळेच्या तोडीला कुठेच कमी नाही

निमोणे  - खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्याची स्थिती प्रचंड खालवल्याचे चित्र आहे. मात्र, तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या पालकांची दानत ही खासगी शाळेच्या तोडीला कुठेच कमी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि त्याला निमित्त ठरले ते भैरवनाथवाडी (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाचे. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात कलेचा अविष्कार इतक्या प्रभावीपणे साकारला की उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाचा खिशाकडे हात गेला आणि हाताला येईल ती नोट त्यांनी त्या गीताला, डान्सला पारितोषिक म्हणून दिली. त्यामुळे या स्नेहसंमेलनाच्यानिमित्ताने बक्षिसापोटी तब्बल ८५ हजार रुपये जमा झाले.भैरवानाथवाडी जिल्हा परिषदेच्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, पोवाडा, लोकगीते, भारुड, शेतकरी व्यथा, समाजप्रबोधनपर नाटिका, कोळीगीते अशा गीतांवरील नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रेक्षकांनी बाल कलाकारांवर बक्षिसांची खैरात केली. यावेळी प्रत्येक गाण्यानंतर पैठणीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराजांवर सादर झालेला पोवाडा हे या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व दुग्धसंवर्धन समितीच्या सभापती सुजाताताई पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, सरपंच मंगलताई म्हस्के, केंद्रप्रमुख लक्ष्मण काळे उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, भैरवनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.एरवी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी लोकवर्गणी मागितल्यावरही जितकी वर्गणी जमली नसती तितकी वर्गणी केवळ दोन-चार तासांच्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून जमली आहे. याचे सारे श्रेय शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच जाते. त्यामुळे या जमलेल्या बक्षिसाच्या रकमेतून विद्यार्थ्यांसाठीच शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्याकरिता वापरल्या जातील. - संतोष घावटे, मुख्याध्यापक

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा