शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे :  मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 19, 2024 15:13 IST

तामनारचे उद्घाटन ॲाक्टोबरपूर्वी

पणजी : युनिटमागे ६० ते ९० पैसेच वीज दरवाढ केलेली आहे. ही वाढ तशी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे, असा दावा करीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दरवाढीचे समर्थन केले. दुसरीकडे तामनार वीज प्रकल्पाचे उद्घाटन येत्या ॲाक्टोबरपर्यंत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की,‘वीज दरवाढ संयुक्त वीज नियामक आयोग  ठरवतो. सरकार नव्हे!. दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारकडून सबसिडी मिळणार. दरवाढ न करता राज्य सरकार जर सबसिडी देत राहिले तर केंद्र काहीच देणार नाही.’ मुख्यमंत्री म्हणाले की घरगुती वापराच्या विजेसाठी ही दरवाढ तशी मोठी नाही. काही प्रमाणात व्यावसायिक आस्थापनांना झळ बसेल. सरकारने गेल्या पाच वर्षात भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारणांवर २ हजार कोटी रुपये खर्च केले. लोकांना वीज खंडित झाली तरीही ते चालत नाही. दर्जेदार वीज हवी असेल तर खर्चही करावा लागणार. त्यासाठी दरवाढ अटळ आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारकडून २५०० कोटी केंद्राकडून सबसिडी मिळू शकते. दर न वाढवल्यास हा निधी मिळू शकणार नाही. आम्ही प्रस्ताव पाठवणार आहेात. ते पुढे म्हणाले की, ‘ राज्यात वीज पायाभूत सुविध वाढवण्यासाठी आणखी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशभरात घरांना भूमिगत केबल देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. इतर राज्यांमध्ये कारखान्यांना भूमिगत केबलसाठी प्राधान्य दिले जाते. गोव्यात भारनियमन किंवा शटडाउन घेतले जात नाही. शेजारी राज्यात हा प्रकार चालतो. संपूर्ण दिवस वीज बंद असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, तामनार प्रकल्पाला विरोध होत असतानाच सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट झालेली आहे. अवघेच काही काम बाकी आहे. येत्या ॲाक्टोबरपर्यंत उद्घाटन होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज