बाबूशच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे

By Admin | Updated: December 1, 2015 01:56 IST2015-12-01T01:56:33+5:302015-12-01T01:56:42+5:30

पणजी : महापालिका निवडणुकीसाठी या वेळी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे असतील. अधिकृत

60 percent new faces in Babush's panel | बाबूशच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे

बाबूशच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे

पणजी : महापालिका निवडणुकीसाठी या वेळी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे असतील. अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी येत्या १३ मार्च रोजी ही निवडणूक घेण्याचे ठरत असल्याने उमेदवार कामाला लागले आहेत. बाबूश पॅनलबरोबरच भाजप तसेच सुरेंद्र फुर्तादो यांचे स्वतंत्र पॅनल मिळून तीन पॅनल्स या वेळी निवडणूक रिंगणात असतील व त्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे.
मोन्सेरात यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आपण सर्व ३0 प्रभागांमध्ये उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे सांगितले. दोन निवडणुकांमध्ये आपले पॅनल विजयी झाले होते. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी करण्याचे किंवा अन्य कोणालाही संधी देण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. फुर्तादो स्वतंत्र पॅनल स्थापन करणार असल्याने त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणुकीत उतरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दल भाष्य करणार नाही. निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन नागरिकांसमोर जाणार, असे विचारले असता, थेट उत्तर न देता जाहीरनामा तयार करूनच जनतेसमोर जाणार आहोत, असे ते म्हणाले.
माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांना विचारले असता, आपले स्वतंत्र पॅनल असेल, असे त्यांनी या प्रतिनिधीला सांगितले. मात्र, अधिक माहिती देण्याचे टाळले.
३० सदस्यीय महापालिकेचा कार्यकाळ येत्या २२ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. प्रभाग पुनर्रचनेचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. प्रभागांची राखीवता, तसेच मतदार याद्या निश्चित करण्याचे कामही आता सुरू होणार आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ५० टक्के महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. काही प्रभागांमध्ये महिला राखीवता नसतानाही त्या प्रभागातून महिलांनी बाजी मारली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने भाजप आमदार सिद्धार्थ कुं कळयेकर
यांची महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 60 percent new faces in Babush's panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.