वर्षात ५ हजार नोकऱ्या
By Admin | Updated: August 7, 2014 01:21 IST2014-08-07T01:16:13+5:302014-08-07T01:21:26+5:30
पणजी : वर्षभरात ५५२ उद्योगांमधून ६६६ कोटींची गुंतवणूक येईल व ५४१७ जणांना रोजगार मिळणार आहे. औद्योगिक भूखंडांना वाढती मागणी आहे.

वर्षात ५ हजार नोकऱ्या
पणजी : वर्षभरात ५५२ उद्योगांमधून ६६६ कोटींची गुंतवणूक येईल व ५४१७ जणांना रोजगार मिळणार आहे. औद्योगिक भूखंडांना वाढती मागणी आहे. ३२ भूखंडासाठी १४० अर्ज आलेले आहेत. येत्या दोन महिन्यांत रिक्त भूखंडांची जाहिरात करू. नगर नियोजनकडील अडचणी दूर झाल्या आहेत. आज उद्योगांमध्ये ९० हजार कामगार काम करीत आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी विधानसभेत दिली.
केंद्रीय उद्योगमंत्री तसेच अन्य मंत्र्यांची भेट घेऊन विषय मांडले आहेत. मुख्यमंत्री रोजगार योजनेचे नामकरण वर्गीस कुरियन असे केलेले आहे. २३३ नवे उद्योजक यातून निर्माण झाले आणि ३९३ लाख रुपये कर्ज वितरित केले.
मंत्री नाईक उद्योग खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. गुंतवणूक धोरणाबद्दल ते म्हणाले की, पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक व ५० हजार नोकऱ्या सत्यात आणू. ज्ञानाधिष्ठित उद्योग, जैवतंत्रज्ञान उद्योगांना प्राधान्य देऊ, विमान तंत्रज्ञान, कृषी आधारित उद्योग आणू. वेर्णा येथे कंटेनर स्थानक येणार. प्रत्येक तालुक्यात औद्योगिक विभाग येतील धारबांदोडा येथे औद्योगिक कचरा विल्हेवाटीची व्यवस्था लवकरच मार्गी लागेल. तुये, वेर्णा, शिरोडा औद्योगिक वसाहतींचा विस्तार चालू आहे. (प्रतिनिधी)