सिलिंडर स्फोटात ५ जखमी
By Admin | Updated: December 9, 2015 02:09 IST2015-12-09T02:09:09+5:302015-12-09T02:09:20+5:30
मडगाव : गांधी मार्केट-मडगाव येथील एका झोपडीवजा घरात गॅस सिलिंडर दुरुस्त करतेवेळी झालेल्या गळतीमुळे स्फोट

सिलिंडर स्फोटात ५ जखमी
मडगाव : गांधी मार्केट-मडगाव येथील एका झोपडीवजा घरात गॅस सिलिंडर दुरुस्त करतेवेळी झालेल्या गळतीमुळे स्फोट
होऊन पाच जण जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत, तर इतर दोघांना मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात
दाखल करण्यात आले.
मडगावच्या अग्निशामक दलाचे गिल्स सोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मंगळवारी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडरला लिकेज असल्याच्या संशयावरून या घरातील भीम जामुनी यांनी मेकॅनिकला खात्री करण्यासाठी बोलावले होते. या वेळी जवळच स्टोव्ह चालू होता.
मेकॅनिक आपले काम करत
असताना गॅस लिकेज झाल्याने सिलिंडरने पेट घेतला व स्फोट झाला. यात
भीम जामुनी यांच्यासह पत्नी सत्यवा जामुनी, मुलगी सुरेखा जामुनी, नातू
रिषभ जामुनी हे जखमी झाले. मेकॅनिकलाही गंभीर इजा झाली; मात्र त्याचे नाव समजू शकले नाही.
दरम्यान, घटनास्थळी माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)