फिरत्या वाहनांद्वारे ४६ टन कांद्याची विक्री
By Admin | Updated: October 24, 2015 02:57 IST2015-10-24T02:56:30+5:302015-10-24T02:57:11+5:30
पणजी : फलोत्पादन विकास महामंडळाद्वारे गावागावांत फिरत्या वाहनांद्वारे सद्या कांदा विक्री करण्यात येत असून प्रति किलोवर २0 टक्के सवलत देउन २५ रुपये

फिरत्या वाहनांद्वारे ४६ टन कांद्याची विक्री
पणजी : फलोत्पादन विकास महामंडळाद्वारे गावागावांत फिरत्या वाहनांद्वारे सद्या कांदा विक्री करण्यात येत असून प्रति किलोवर २0 टक्के सवलत देउन २५ रुपये प्रती किलो दराने हा कांदा विकला जात आहे. आतापर्यंत फिरत्या गाड्यांवरून फलोत्पादन महामंडळाने ४६ टन कांद्याची विक्री करण्यात आली आहे.
दीड महिन्यापूर्वी खुल्या बाजारात कांद्याचा दर ८0 रुपये किलो झाला होता. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले कांदे नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावेत म्हणून फलोत्पादन महामंडळान राज्यातील ३४0 ग्रामीण आणि शहरी भागात १८ गाड्यांवरून ४0 रुपये दराने कांदेविक्री सुरू केली होती. खुल्या बाजारापेक्षा फलोत्पादन दालनांवर कमी दराने कांदेविक्री होत होती. मात्र, ग्रामीण जनतेला स्वस्तात कांदे मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता.
राज्याला दररोज साधारण ६0 ते ७0 टन कांद्याची आवश्यकता असते. गणेश चतुर्थीच्या काळात कमी प्रमाणात कांद्याची विक्री होेते. यंदा दर वाढल्यानेही काही प्रमाणात कांद्याच्या विक्रीत घट झाली असल्याचे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लॅरी बार्रेटो यांनी सांगितले.
फिरत्या वाहनांद्वारे आतापर्यंत ४६ टन कांद्याची विक्री झाली आहे. सध्या कांद्याचा दर बऱ्यापैकी उतरला असून २५ रुपये किलो दराने फलोत्पादन दालनांत विक्रीस ठेवले आहेत.
पणजी, म्हापसा, डिचोली, फोंडा, वास्को, काणकोण, मडगाव, कुडचडे या शहरांतील कदंब बसस्थानकांवरही कांद्याची विक्री करण्यात आली. सध्या फलोत्पादनच्या फिरत्या गाड्यांवरील कांदाविक्री सुरू आहे. मात्र, ती सवलत दराने दिली जात नाही.
(प्रतिनिधी)