४५व्या इफ्फीचा आज समारोप
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:59:15+5:302014-11-30T00:59:51+5:30
पणजी : बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सिनेतारकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात रविवारी ४५व्या इफ्फीवर पडदा पडणार आहे.

४५व्या इफ्फीचा आज समारोप
पणजी : बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सिनेतारकांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात रविवारी ४५व्या इफ्फीवर पडदा पडणार आहे. समारोपाला मल्याळी अभिनेते जयराम सुब्रमण्यम हे प्रमुख पाहुणे, तर अजय देवगण, दीपिका पदुकोण, जुही चावला व इतर दिग्गज कलाकार येण्याची शक्यता आहे.
दहा दिवस चाललेल्या इफ्फीच्या समारोपासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समारोपही बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे.
सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पीआयबीकडून देण्यात आली. समारोप सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटांना, दिग्दर्शनासाठी व इतर पुरस्कार वितरणाबरोबरच महत्त्वाचा कार्यक्रम असेल तो विख्यात चित्रपट दिग्दर्शक वाँग कार वॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा. या चिनी दिग्दर्शकाचा ‘द ग्रँड मास्टर’ चित्रपटही या वेळी प्रदर्शित केला जाईल.