शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

कावरेत प्रक्षोभ मालवाहतुकीस स्थानिकांचा तीव्र विरोध ३४ जणांना अटक, १० महिलांचा समावेश प्रकरण चिघळण्याची शक्यता

By admin | Updated: May 9, 2014 02:14 IST

केपे : स्थानिकांना विश्वासात न घेताच ई-लिलावातील खनिजाची वाहतूक बेकायदारितीने परस्पर केली जात असल्याचा आरोप करत कावरे पिर्ला कावरे येथील लोकांनी ही वाहतूक आज अडवून धरली. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी संघटितपणे स्थानिकांचा विरोध मोडून काढत, तसेच ३४ नागरिकांना अटक करत माल वाहतूक पूर्ववत सुरू केली असली तरी या एकतर्फी भूमिकेमुळे या भागात तीव्र असंतोष पसरला असून त्याचे पडसाद आगामी काळातही पडू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

केपे : स्थानिकांना विश्वासात न घेताच ई-लिलावातील खनिजाची वाहतूक बेकायदारितीने परस्पर केली जात असल्याचा आरोप करत कावरे पिर्ला कावरे येथील लोकांनी ही वाहतूक आज अडवून धरली. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी संघटितपणे स्थानिकांचा विरोध मोडून काढत, तसेच ३४ नागरिकांना अटक करत माल वाहतूक पूर्ववत सुरू केली असली तरी या एकतर्फी भूमिकेमुळे या भागात तीव्र असंतोष पसरला असून त्याचे पडसाद आगामी काळातही पडू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.ही माल वाहतूक सुरू होताच ती बेकायदेशीर आहे, अन्यथ: तद्विषयक कागदपत्रे आम्हाला दाखवावीत, अशी मागणी करत स्थानिकांचा जमाव कंपनीच्या गेटबाहेर जमला. त्याचवेळी केपेचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर तेथे आले. ही वाहतूक संपूर्णपणे कायदेशीर आहे, त्याविषयीची कागदपत्रे कुणाला पाहायची असल्यास आपल्याकडे अर्ज करा, कागदपत्रे पहावयास उपलब्ध करून देतो, असे सांगून त्यांनी स्थानिकांना वाहतुकीला मोकळीक देण्यास सांगितले. मात्र, स्थानिकांनी गेटसमोरून हटण्यास नकार दिला. तेव्हा उपजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ३४ स्थानिकांना अटक करण्यात आली. यात २४ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे.पंचवाडकर यांच्या समवेत या कारवाईप्रसंगी मामलेदार मनोज कोरगावकर, उपअधीक्षक सुभाष गोलतकर, निरीक्षक राम आसरे, रवी देसाई, मनोज म्हार्दोळकर, हरिष मडकईकर यांचीही उपस्थिती होती.दरम्यान, अटक झालेल्या आंदोलकांची भेट दक्षिण गोवा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्वाती केरकर, तसेच केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी घेऊन त्यांना याप्रती सहानुभूती व्यक्त केली. आंदोलकांना फौजदारी दंड संहितेच्या कलम १५१ अनुसार प्रतिबंधक उपाय म्हणून अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. पुढील तपास सुभाष गोलतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राम आसरे करत आहेत.चौकट-राजकीय वरदहस्त आणि सहभागहीकावरेतील ज्या खाणीतून हे खनिज उचलले जात आहे ते दिनार तारकर यांच्या मालकीचे आहे. या खाणीवर काम करणार्‍या ५३ कामगारांना सध्याच्या प्रक्रियेत सामावून घेतलेले नाही. या कामगारांच्या मते खाणीतून काढून ठेवलेला माल ६.५ लाख टन इतका आहे. मात्र, तो केवळ दीड लाख टन असल्याचे नोंदविण्यात आले आहे. प्रशासन आणि स्थानिकांच्या डोळ्यात धूळ फेकून अतिरिक्त माल तेथून गायब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यात खाण उद्योजकांपेक्षा काही राजकारणीच अधिक रस घेत असून एका आमदाराने दाखवलेले स्वारस्य लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले.चौकट-मालवाहतूक बेकायदाकावरे पिर्ला येथील खाणीवरील मालाची वाहतूक कायदेशीर आहे का, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. खाण व्यवसायातील एक तज्ज्ञ राजेंद्र काकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील खाण व्यवसायाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशातील मुद्दा क्र. ५७ अनुसार मायणा-कुडतरी ते कुडचडे या दरम्यान मालवाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. कावरे येथील खाणीवरून जो माल आज उचलला गेला तो कुडचडे येथे नेला जात होता. या ठिकाणादरम्यानच्या वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नाही.राजेंद्र काकोडकर म्हणाले की, या बेकायदा माल वाहतुकीसंदर्भात आम्ही खाण खाते, उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकाचे निरीक्षक राम आसरे यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासनही दिले आहे. मात्र, एकंदर प्रकार गंभीर आणि संशयास्पद असून या वाहतुकीस पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.