कावरेत प्रक्षोभ मालवाहतुकीस स्थानिकांचा तीव्र विरोध ३४ जणांना अटक, १० महिलांचा समावेश प्रकरण चिघळण्याची शक्यता

By Admin | Updated: May 9, 2014 02:14 IST2014-05-09T00:51:21+5:302014-05-09T02:14:39+5:30

केपे : स्थानिकांना विश्वासात न घेताच ई-लिलावातील खनिजाची वाहतूक बेकायदारितीने परस्पर केली जात असल्याचा आरोप करत कावरे पिर्ला कावरे येथील लोकांनी ही वाहतूक आज अडवून धरली. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी संघटितपणे स्थानिकांचा विरोध मोडून काढत, तसेच ३४ नागरिकांना अटक करत माल वाहतूक पूर्ववत सुरू केली असली तरी या एकतर्फी भूमिकेमुळे या भागात तीव्र असंतोष पसरला असून त्याचे पडसाद आगामी काळातही पडू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

34 people arrested, 10 women among women | कावरेत प्रक्षोभ मालवाहतुकीस स्थानिकांचा तीव्र विरोध ३४ जणांना अटक, १० महिलांचा समावेश प्रकरण चिघळण्याची शक्यता

कावरेत प्रक्षोभ मालवाहतुकीस स्थानिकांचा तीव्र विरोध ३४ जणांना अटक, १० महिलांचा समावेश प्रकरण चिघळण्याची शक्यता

केपे : स्थानिकांना विश्वासात न घेताच ई-लिलावातील खनिजाची वाहतूक बेकायदारितीने परस्पर केली जात असल्याचा आरोप करत कावरे पिर्ला कावरे येथील लोकांनी ही वाहतूक आज अडवून धरली. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी संघटितपणे स्थानिकांचा विरोध मोडून काढत, तसेच ३४ नागरिकांना अटक करत माल वाहतूक पूर्ववत सुरू केली असली तरी या एकतर्फी भूमिकेमुळे या भागात तीव्र असंतोष पसरला असून त्याचे पडसाद आगामी काळातही पडू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
ही माल वाहतूक सुरू होताच ती बेकायदेशीर आहे, अन्यथ: तद्विषयक कागदपत्रे आम्हाला दाखवावीत, अशी मागणी करत स्थानिकांचा जमाव कंपनीच्या गेटबाहेर जमला. त्याचवेळी केपेचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर तेथे आले. ही वाहतूक संपूर्णपणे कायदेशीर आहे, त्याविषयीची कागदपत्रे कुणाला पाहायची असल्यास आपल्याकडे अर्ज करा, कागदपत्रे पहावयास उपलब्ध करून देतो, असे सांगून त्यांनी स्थानिकांना वाहतुकीला मोकळीक देण्यास सांगितले. मात्र, स्थानिकांनी गेटसमोरून हटण्यास नकार दिला. तेव्हा उपजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ३४ स्थानिकांना अटक करण्यात आली. यात २४ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे.
पंचवाडकर यांच्या समवेत या कारवाईप्रसंगी मामलेदार मनोज कोरगावकर, उपअधीक्षक सुभाष गोलतकर, निरीक्षक राम आसरे, रवी देसाई, मनोज म्हार्दोळकर, हरिष मडकईकर यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान, अटक झालेल्या आंदोलकांची भेट दक्षिण गोवा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्वाती केरकर, तसेच केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी घेऊन त्यांना याप्रती सहानुभूती व्यक्त केली. आंदोलकांना फौजदारी दंड संहितेच्या कलम १५१ अनुसार प्रतिबंधक उपाय म्हणून अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. पुढील तपास सुभाष गोलतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राम आसरे करत आहेत.
चौकट-
राजकीय वरदहस्त आणि सहभागही
कावरेतील ज्या खाणीतून हे खनिज उचलले जात आहे ते दिनार तारकर यांच्या मालकीचे आहे. या खाणीवर काम करणार्‍या ५३ कामगारांना सध्याच्या प्रक्रियेत सामावून घेतलेले नाही. या कामगारांच्या मते खाणीतून काढून ठेवलेला माल ६.५ लाख टन इतका आहे. मात्र, तो केवळ दीड लाख टन असल्याचे नोंदविण्यात आले आहे. प्रशासन आणि स्थानिकांच्या डोळ्यात धूळ फेकून अतिरिक्त माल तेथून गायब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यात खाण उद्योजकांपेक्षा काही राजकारणीच अधिक रस घेत असून एका आमदाराने दाखवलेले स्वारस्य लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले.

चौकट-
मालवाहतूक बेकायदा
कावरे पिर्ला येथील खाणीवरील मालाची वाहतूक कायदेशीर आहे का, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. खाण व्यवसायातील एक तज्ज्ञ राजेंद्र काकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील खाण व्यवसायाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशातील मुद्दा क्र. ५७ अनुसार मायणा-कुडतरी ते कुडचडे या दरम्यान मालवाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. कावरे येथील खाणीवरून जो माल आज उचलला गेला तो कुडचडे येथे नेला जात होता. या ठिकाणादरम्यानच्या वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नाही.
राजेंद्र काकोडकर म्हणाले की, या बेकायदा माल वाहतुकीसंदर्भात आम्ही खाण खाते, उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकाचे निरीक्षक राम आसरे यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासनही दिले आहे. मात्र, एकंदर प्रकार गंभीर आणि संशयास्पद असून या वाहतुकीस पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: 34 people arrested, 10 women among women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.