शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 11:17 IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याची बैठक यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अभ्यासानंतरच हा निर्णय घेतला जाईल. सध्या कालव्यांच्या दुरुस्तीची गरज असून, त्यासाठी ३३० कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच म्हादईप्रश्नी आम्ही गोव्याबरोबर असून, एकत्रितपणे कर्नाटकशी लढा देऊ, असे आश्वासनही दिले.

'तिळारी' नियंत्रण मंडळाची काल, शनिवारी तब्बल दहा वर्षांनी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन करण्यासाठी गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पुढाकार घेतला. निकृष्ट बांधकामामुळे वरचेवर फुटणारे कालवे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच तिळारीविषयी अन्य महत्त्वाचे विषय बैठकीत चर्चेला आले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा आणि निर्णयही झालेले आहेत. तिळारी धरणात भरपूर पाणी आहे. परंतु ते वाया जात आहे. कालव्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रम हाती घेतली जाईल. त्यासाठी उभय राज्यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच होईल. युद्धपातळीवर कालवे दुरुस्ती होतील. तिळारी धरणग्रस्तांच्या नुकसानभरपाईचाही प्रश्न होता तोही निकालात काढण्यात आलेला आहे.

आजची बैठक अतिशय सकारात्मक झाली. तिळारी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याबाबतीत सखोल अभ्यास करण्याचा आदेश मी दिलेला आहे. अभ्यासांतीच योग्य तो निर्णय घेतला जाईल.

गोवा व महाराष्ट्राचा हा संयुक्त धरण प्रकल्प असून त्यावर ७३.३ टक्के खर्च गोवा सरकारने तर २६.७ टक्के महाराष्ट्र सरकारने केला आहे. हे धरण बांधताना गोव्यात १६,९७८ हेक्टर तर महाराष्ट्रात ६,६७६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु ते सर्वच काही साध्य झालेले नाही. तिळारी धरणाची क्षमता २१.९३ टीएमसी आहे. यातील १६.१० टीएमसी पाणी गोवा सरकार वापरते तर ५.८३ टीएमसी पाणी महाराष्ट्र सरकार वापरते.

वेळेत पाणी मिळणे गरजेचे

योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच गोवा सरकारने 'तिळारी साठी ओलित क्षेत्र विकास मंडळ स्थापन केलेले आहे. तिळारीचे पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात घेऊन संपूर्ण बार्देश तालुका व डिचोली तालुक्यातील लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. तिळारी कालव्याच्या पाण्यावर पेडणे, डिचोली तालुक्यातील शेती अवलंबून आहे. जर पाणी वेळेत मिळाले नाही तर शेती सुकून जाण्याच्या घटनादेखील याआधी घडलेल्या आहेत.

२२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख : सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, तिळारी धरणग्रस्त २२ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बैठकीत झालेला आहे. तिळारीच्या कालव्यांची दुरुस्ती हा प्रमुख विषय होता. ३० दिवसांच्या कालावधीत कालवे दुरुस्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे. तिळारी धरण पेडणे, बार्देश व डिचोली तालुक्यांना तसेच खास करून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे हे धरण गोव्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तिळारीची उंची वाढविण्याचा प्रश्नही चर्चेला आला. महाराष्ट्र सरकारने सखोल अभ्यास करूनच यावर निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली आहे. 

'म्हादई' प्रश्नी कर्नाटकशी लढू

शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्र भाऊ-भाऊ आहेत. सध्या गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईचा लढा सुरु आहे. या लढ्यात आम्ही गोव्यासोबत आहोत. म्हादईचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्र गोव्यासोबत कर्नाटकशी लढा देईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

कालव्यांना भगदाड

तिळारी प्रकल्पाला ३० ते ३५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. कालव्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने वरचेवर ते फुटतात. त्यामुळे गोव्यासाठी 'तिळारीचे पाणी तसे बेभरवशाचे बनले आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधून मधून कालवे फुटतात. ऑक्टोबर २०२१ मध्ये मणेरी- धनगरवाडी येथे डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडण्याची घटना त्यामुळे डाव्या कालव्यातून सुमारे दीड महिना पाणी बंद राहिले. गेल्या वर्षीही कालवे फुटल्या काही दिवस पाणी पुरवठा झाला नाही.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस