३० युवा शास्त्रज्ञांचा सन्मान

By Admin | Updated: December 22, 2014 01:49 IST2014-12-22T01:48:50+5:302014-12-22T01:49:47+5:30

पुरस्कार वितरण : ३७ संशोधकांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमीची फेलोशिप

30 young scientists honor | ३० युवा शास्त्रज्ञांचा सन्मान

३० युवा शास्त्रज्ञांचा सन्मान

पणजी : इंडियन नॅशनल सायन्स अकादमीतर्फे रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या ३० युवा शास्त्रज्ञांना २०१४ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यात मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रातील तीन युवा शास्त्रज्ञांचा समावेश होता. याशिवाय ३७ संशोधकांना संस्थेची फेलोशिप बहाल करण्यात आली.
दोनापावल येथे एनआयओ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. राघवेंद्र गदगकर यांच्या हस्ते फेलोशिप देण्यात आली. तंजावर येथील सास्त्रा विद्यापीठाच्या स्कूल आॅफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाचे सहअध्यापक डॉ. व्यंकटेश पै यांना आधुनिक भाषेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या वर्षाचा युवा विज्ञान इतिहासकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भौतिकशास्र आणि संस्कृतसाठीही त्यांनी भरीव काम केले आहे.
भुवनेश्वरचे इन्स्टिट्यूट आॅफ फिजिक्सचे डॉ. संजीवकुमार अगरवाल, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे डॉ. सूर्यसारथी बोस, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. सायन चक्रवर्ती, तिरुवअनंतपुरमच्या स्पेस रिसर्च सेंटरचे डॉ. विनित चंद्रशेखर नायर, मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डॉ. अभिजीत चॅटर्जी, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे डॉ. सौम्या दास, दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ प्लांट जेनोम रिसर्चच्या डॉ. रोहिणी गर्ग, कोलकाताच्या सीएसआयआरमधील डॉ. ज्यून घोष, कोलकाताच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या डॉ. नीना गुप्ता. पुणे येथील आयआयएसईआर संस्थेचे डॉ. अमित प्रताप होगाडी, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाचे डॉ. सुकांता घोष, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्रातील मणिकृष्ण कर्री, अहमदाबाद विद्यापीठाचे आशुतोष कुमार, जोधपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डॉ. महेश कुमार, लखनौच्या सीएसआयआरच्या डॉ. चारुलता, मुंबईच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे देवेंद्र मैती, इंदोरचे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे रजनीश मिश्रा, खडगपूरच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अनिमेश मुखर्जी, बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे शंतनू मुखर्जी, हैदराबादच्या डिफेन्स रिसर्च लॅबचे मिथुन पलित, पुणे येथील आयआयएसईआरच्या गायत्री पाननघट, दिल्लीच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे विमलेश पंत, भोपाळच्या इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या मालक्ष्मी राधाकृष्णन, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्राचे प्रकाशचंद्र राऊत, कोइंबतूरच्या सलीम अली सेंटर फॉर नॅचरल हिस्टरीचे राम प्रताप सिंह, अलाहाबादच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सुनीलकुमार सिंह, मुंबईच्या भाभा अणु ऊर्जा केंद्राचे आशिषकुमार श्रीवास्तव, दिल्लीतील सीएसआयआरचे गौरव वर्मा, बंगळुरूच्या नेहरू संशोधन केंद्राच्या डॉ. रजनी विश्वनाथ व दिल्लीतील नेहरू विद्यापीठाचे डॉ. विजय यादव यांचा यात समावेश होता.
१९७४ पासून संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात. पदक, प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून ३५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनासाठी गौरविले जाते. फेलोशिपसाठी ३७० नामांकने आली होती, पैकी ३७ जणांची निवड केली. फेलोशिप प्राप्त झालेल्या नव्या सदस्यांनी या वेळी शपथ घेतली. विज्ञानाचा दर्जा उंचावण्यासाठी संशोधन करणार, असे ते म्हणाले. युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी ५५७ नामांकने आली होती. त्यातील ३० जणांची निवड झाली. १९७४ पासून आजतागायत एकूण ७०८ शास्त्रज्ञांना पुरस्कार बहाल केले. तसेच दहा शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार दिले. मानपत्र व ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 30 young scientists honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.