३0 हजार निवृत्तांना ‘डीए’वाढीची भेट
By Admin | Updated: December 5, 2014 01:05 IST2014-12-05T01:04:20+5:302014-12-05T01:05:42+5:30
पणजी : सरकारी पेन्शनरांना महागाई भत्त्यात १ जुलैपासूनचा ७ टक्के वाढीचा आदेश जारी झाला असून राज्यातील सुमारे ३0 हजार निवृत्तांना याचा लाभ मिळणार आहे.

३0 हजार निवृत्तांना ‘डीए’वाढीची भेट
पणजी : सरकारी पेन्शनरांना महागाई भत्त्यात १ जुलैपासूनचा ७ टक्के वाढीचा आदेश जारी झाला असून राज्यातील सुमारे ३0 हजार निवृत्तांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे मासिक ३ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
वित्त खात्याचे संयुक्त संचालक मायकल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतनावरच दरमहा ३६ कोटी रुपये बाहेर काढावे लागतात. केंद्र सरकारने पेन्शनरांचा महागाई भत्ता १00 टक्क्यांवरून वाढवून १0७ टक्के केला आहे. राज्य सरकारने सेवेतील नियमित कर्मचाऱ्यांना याआधीच वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे. सरकारी पेन्शनर तसेच फॅमिली पेन्शनरांच्या बाबतीत आदेश येण्यास विलंब लागला. त्यामुळे अंमलबजावणी विलंबाने होत आहे. जुलैपासून आतापर्यंतची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी चालू महिन्यातच मिळणार आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही भत्त्यात वाढ केली की, कालांतराने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही ती लागू होते. पेन्शनरांना नाताळला महागाई भत्त्यात वाढ मिळणार असल्याने ते खुश आहेत. राज्यात सुमारे ५५ हजार सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना आधीच महागाई भत्ता मिळालेला आहे.
(प्रतिनिधी)