शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आल्तो - दाबोळी महामार्गावरील अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 18:49 IST

सोमवारी (दि.२९) पहाटे सडा, मुरगाव येथे राहणारा २७ वर्षीय अविनाश मारुती जाळगेकर हा तरुण दुचाकीने पणजीच्या दिशेने जात असताना आल्तो - दाबोळी महामार्गाच्या बाहेर असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला.

वास्को -  सोमवारी (दि.२९) पहाटे सडा, मुरगाव येथे राहणारा २७ वर्षीय अविनाश मारुती जाळगेकर हा तरुण दुचाकीने पणजीच्या दिशेने जात असताना आल्तो - दाबोळी महामार्गाच्या बाहेर असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच  मृत्यू झाला. अविनाश चा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाहेर पोचून हा अपघात घडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने तो येथेच मरण पावला.वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विकास देयीकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार पहाटे पाच वाजण्याच्या समारास सदर अपघात घडला. सडा भागात राहणारा अविनाश काही कामानिमित्ताने ‘एवियेटर’ दुचाकीने (क्र: जीए ०६ आर १६१८) पणजीच्या दिशेने जात होता. आल्तो - दाबोळी येथील ‘सेंट अ‍ॅथनी चेपल’ समोरील रस्त्यावर अविनाश जेव्हा पोचला त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाहेर पोचून येथे असलेल्या मोठ्या दगडाला त्याच्या दुचाकीने जबर धडक दिली. ह्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार बसून तो जागीच मरण पोचल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक विकास यांनी दिली.सदर अपघाताची माहीती मिळताच पहाटे पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन मयत अविनाश याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या शवगृहात पाठवून दिला. सोमवारी पहाटे दुर्देवी रित्या मरण पोचलेला अविनाश हा मूळ बेळगाव, कर्नाटक येथील रहीवाशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. तो येथील एका हॉटेलमध्ये काम करण्याबरोबरच मोकळ््या वेळेत तो इलेक्ट्रीशनचे काम घ्यायचा अशी माहीती सूत्रांनी दिली. वास्को पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा