दाबोळी येथे २७ लाखांचे सोन्याचे बिस्किट जप्त

By Admin | Updated: October 28, 2015 02:14 IST2015-10-28T02:13:27+5:302015-10-28T02:14:06+5:30

वास्को : दुबईहून कतार एरव्हेज विमानाने दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कासारगौड-केरळ येथील फरहान अब्दुला हनिफ (२१) या युवकाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी २७ लाख किमतीचे सोन्याचे एक

27 bk gold biscuit seized at Daboli | दाबोळी येथे २७ लाखांचे सोन्याचे बिस्किट जप्त

दाबोळी येथे २७ लाखांचे सोन्याचे बिस्किट जप्त

वास्को : दुबईहून कतार एरव्हेज विमानाने दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कासारगौड-केरळ येथील फरहान अब्दुला हनिफ (२१) या युवकाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी २७ लाख किमतीचे सोन्याचे एक बिस्किट व सिगारेटची २५ कार्टून जप्त केली. कस्टम अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कतार एरव्हेजचे विमान (क्यू आर ५२२) हे दोहामार्गे दुबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. त्या वेळी प्रवाशांची तपासणी करताना या इसमाने ट्रॉलीवरून घेऊन जाणाऱ्या बॅगच्याखाली सोन्याचे बिस्किट लपून ठेवलेले आढळून आले. हे बिस्किट १००० ग्रॅमचे असून सुमारे २७ लाख किमतीचे असल्याचे उघडकीस आले. हे बिस्किट आनंद नामक इसमाने आपल्याला दुबई येथे दिल्याची कबुली फरहान याने कस्टम अधिकाऱ्यांना दिली. कस्टम अधिकाऱ्यांनी कस्टम कायदा ११० व १११ कलमांतर्गत नोंद केल्याची माहिती कस्टम अधिकारी के. अन्नापाजकन यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: 27 bk gold biscuit seized at Daboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.