दाबोळी विमानतळावर २.६२ कोटींचे सोने जप्त
By Admin | Updated: June 18, 2015 01:55 IST2015-06-18T01:55:14+5:302015-06-18T01:55:23+5:30
वास्को : दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१७) पुन्हा एकदा अशाच एका सोन्याच्या तस्करी प्रकरणात

दाबोळी विमानतळावर २.६२ कोटींचे सोने जप्त
वास्को : दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१७) पुन्हा एकदा अशाच एका सोन्याच्या तस्करी प्रकरणात गुंतलेल्या भटकळच्या महिलेकडून कस्टमने जवळजवळ साडेनऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या बिस्किटांची किंमत २ कोटी ६२ लाख होते. आठवडाभरात कस्टमने केलेल्या कारवाईत एकूण पावणेपाच कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात यश मिळविले.
बुधवारी पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या ९९४ या क्रमांकाच्या विमानातील शाहीन हुसेन गडकर (भटकळ) या महिला प्रवाशाकडून कस्मटच्या अधिकाऱ्यांनी ९ किलो ४४० किलोग्रॅमची ८१ बिस्किटे जप्त केली. या मालाची एकूण किंमत २ कोटी ६२ लाख रुपये आहे. गेल्या गुरुवारी (दि.११) कस्टमने केलेल्या कारवाईत भटकळ येथीलच सजीद अहमद इकिर याच्याकडून ७ किलो ७०० ग्रॅम वजनाची २ कोटी १५ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे हस्तगत केली होती. या पाठोपाठ बुधवारी ही दुसरी मोठी कारवाई कस्टमने केली आहे.
दुबईहून बुधवारी पहाटे ४.३० वा. दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याचा सुगावा कस्टम अधिकाऱ्यांना लागला होता. एअर इंडियाचे ९९४ या क्रमांकाचे विमान दाखल होताच सर्व प्रवाशांचा कसून तपास केला
(पान २ वर)