२.५८ कोटींचे

By Admin | Updated: June 8, 2014 01:24 IST2014-06-08T01:18:07+5:302014-06-08T01:24:07+5:30

पणजी : तस्करी करून सोने आणण्याचे प्रयत्न सुरूच असून अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना रंगेहाथ पकडण्याची आपली मोहीम सीमाशुल्क खात्याने दाबोळी विमानतळावर सुरूच ठेवली आहे.

2.58 crores | २.५८ कोटींचे

२.५८ कोटींचे

पणजी : तस्करी करून सोने आणण्याचे प्रयत्न सुरूच असून अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना रंगेहाथ पकडण्याची आपली मोहीम सीमाशुल्क खात्याने दाबोळी विमानतळावर सुरूच ठेवली आहे. शनिवारी अशा प्रकारच्या कारवाईत विमानतळावर सीमाशुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकूण २ कोटी ५८ लाखांचे सोने पकडले. या प्रकरणी एकूण तीन व्यक्तींना अटक झाली आहे.
एक प्रवासी एअर अरेबिया विमानाने आला होता. बेकायदा पद्धतीने आणलेले हे सोने पकडून केरळमधील व्यक्तीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर केरळमधील आणखी दोन व्यक्ती एअर इंडिया विमानाने दाबोळी विमानतळावर उतरल्या. तिन्ही व्यक्ती केरळमधील असून त्यांनी प्रत्येकी ११६ ग्रॅम वजनाची एकूण २० सोन्याची बिस्किटे विदेशातून आणली होती. कोणत्याही कागदपत्रांविना आणि करभरणा न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणले गेल्यानंतर ते पकडले गेले. या सोन्याची किंमत सुमारे २ कोटी ५८ लाख रुपये आहे, असे सूत्रांनी सांगितले. सीमाशुल्क खात्याने गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात सोने पकडून सोन्याची तस्करी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: 2.58 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.