शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बस दुचाकी अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:32 IST

उत्तर गोव्यातील आगशी ‘बायपास’ महामार्गावर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बिठ्ठोण येथील २४ वर्षीय ऋषीकेश नाईक या तरुणाचा मृत्यू झाला.

 वास्को: गुरूवारी (दि.१९) दुपारी उत्तर गोव्यातील आगशी ‘बायपास’ महामार्गावर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बिठ्ठोण येथील २४ वर्षीय ऋषीकेश नाईक या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाता वेळी ऋषीकेश नाईक याच्या दुचाकीमागे बिठ्ठोण येथील अनिश शेट नावाचा २१ वर्षीय तरुण प्रवास करत असून या अपघातातून सुदैवाने तो फक्त किरकोळ जखमा होऊन सुखरूप बचावला. ऋषीकेश व अनिश प्रवास करत असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर त्या अज्ञात बसचालकाने बससहीत घटनास्थळावरून पोबारा काढला असून आगशी पोलीस त्याच्या विरुद्ध ‘हीट अ‍ॅण्ड रन’ चे प्रकरण नोंद केले आहे.आगशी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी दुपारी २.१० च्या सुमारास सदर अपघात घडला. बिठ्ठोण येथे राहणारा ऋषीकेशव त्याचा साथीदार अनिश हे दोघेही तरुण ‘फसीनो’ दुचाकीवरून जात होते. जेव्हा ते आगशी बायपास रस्त्यावर पोचले त्यावेळी त्यांना एका अज्ञात बसने धडक दिल्यानंतर अज्ञात बसचालकाने बससहीत घटनास्थळावरून पोबारा काढला. दुचाकीला धडक दिल्याने ऋषीकेश व अनिश रस्त्यावर फेकले जाऊन यात ऋषीकेश गंभीर जखमी झाला. सदर अपघात घडल्यानंतर दोघांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले, मात्रे येथे पोचण्यापूर्वीच ऋषीकेश चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले अशी माहीती पोलीस उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी दिली. दरम्यान सदर अपघातातून सुदैवाने अनिश किरकोळ जखमा होऊन बचावल्याची माहीती पोलीसांनी देऊन त्याच्यावर उपचार करून नंतर त्याला इस्पितळातून सोडण्यात आले. सदर प्रकरणात आगशी पोलीसांनी ठोकर देऊन घटनास्थळावरून पोबारा काढलेल्या त्या अज्ञात बसचालका विरुद्ध ‘हीट अ‍ॅण्ड रन’ चे प्रकरण नोंद केले असल्याची माहीती पोलीसांनी दिली.दरम्यान आगशी येथील बायपास महामार्गावर दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पोबारा काढलेल्या त्या बसचालकाला बससहीत उशिरा रात्री पकडण्यात आल्याची माहीती आगशी पोलीस सूत्रांनी दिली. ही खासगी बस कर्नाटक येथील असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा