ट्रकमालकांना २४ तासांची मुदत
By Admin | Updated: December 13, 2015 01:46 IST2015-12-13T01:46:12+5:302015-12-13T01:46:21+5:30
पणजी : येत्या २४ तासांत म्हणजे सोमवारपर्यंत संप मिटवा आणि खनिज वाहतूक सुरू करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री

ट्रकमालकांना २४ तासांची मुदत
पणजी : येत्या २४ तासांत म्हणजे सोमवारपर्यंत संप मिटवा आणि खनिज वाहतूक सुरू करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ट्रकमालकांना शनिवारी दिल्या. राज्यातील खनिजवाहू ट्रकांनी अनेक दिवस संप केल्यामुळे खाण व्यवसायासमोर अडथळा निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी कठोर भूमिका घेतली.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी खाणग्रस्त भागातील भाजपच्या पाच आमदारांची बैठक घेतली होती. खाण व्यवसाय नव्याने सुरू होण्यासाठी ट्रकांनी खनिज वाहतूक करणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी तुम्ही ट्रकमालकांना सरकारचे म्हणणे पटवून द्या, असे मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना सांगितले होते. शुक्रवारी काही ट्रकमालक ऐकण्यास तयार नव्हते.
शनिवारी सायंकाळी आल्तिनो येथे शासकीय निवासस्थानी साखळीचे आमदार प्रमोद सावंत व मयेचे आमदार अनंत शेट यांच्यासोबत पार्सेकर यांनी पुन्हा बैठक घेतली. ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस व अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. (पान २ वर)